महिला पोलिस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू; बहिणीचा गंभीर आरोप…

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू असून, स्मिता माने यांचे पती पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने याला कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या घटनेमुळे पोलिस दल आणि संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

महिला हवालदार स्मिता माने या मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे त्या कुठे गेल्या, याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्हता. मात्र दोन दिवसानंतरत्यांचा मृतदेह बिडवाडी–हुंबरणे येथील दाट जंगलात गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पाठवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मृत स्मिता माने यांच्या बहिणीने दिलेल्या अधिकृत तक्रारीनुसार, पती सचिन माने हा सातत्याने स्मिता यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. याच सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली किंवा हा घातपात करून त्यांची हत्या करण्यात आली, असा संशय व्यक्त केला होता. नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे कणकवली पोलिसांनी कठोर पावले उचलत सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आरोपी पती सचिन माने याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या सचिन माने याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, पुढील तपास कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास बडवे करत आहेत. या प्रकरणात लवकरच शवविच्छेदन अहवाल समोर येणार असून, त्यानंतर आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…

हत्या झालेल्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रेंचा मृत्यू दाखला देण्यास पनवेल महापालिकेची टाळाटाळ…

पोलिस मुख्यालयात जाताना अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू…

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!