मोठा ट्विस्ट! मॉडेल श्रद्धा दुबेच्या खोलीत आढळल्या शक्तीवर्धक गोळ्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): देशभर गाजत असलेल्या रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून मुख्य फरार आरोपी मॉडेल श्रद्धा दुबे हिच्याबाबत पोलीस तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हजरगंज पोलिसांनी जेव्हा श्रद्धा दुबे हिच्या फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा तिथे काही शक्तिवर्धक औषध साठा आढळून आला आहे. तसेच, घटनेच्या दिवशी त्या फ्लॅटमध्ये श्रद्धा दुबे आणि तिची बहीण रश्मी या दोघीही उपस्थित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

शिवा शर्माच्या संशयास्पद मृत्यूनंतर आरोपी श्रद्धा दुबे हिने तत्काळ लखनौमधून अयोध्येच्या दिशेने पळ काढला होता. हजरगंज पोलीस सध्या टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास करत आहे. या प्रकरणात श्रद्धाचा शोध घेण्यासाठी दिल्लीपासून ते थेट नेपाळपर्यंत पोलिसांची विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. सध्या पाच संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

श्रद्धा दुबे हिचं यापूर्वीच लग्न झालं होतं. रायबरेली येथे पती प्रिंस दुबे हिच्यासोबत राहणारी श्रद्धा साधारण १० वर्षांपूर्वी पतीला सोडून लखनऊला आली होती. मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याच्या आणि करोडपती बनण्याच्या तीव्र महत्त्वाकांक्षापोटी तिने लखनऊमध्ये मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला आणि उच्चभ्रू लोकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

पोलिसांनी जेव्हा श्रद्धा दुबे हिच्या मोबाईलची कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासली, तेव्हा त्यामध्ये काही मोठे बिल्डर, राजकीय नेते आणि अनेक प्रभावशाली व्यक्तींचे मोबाईल नंबर आढळून आले आहेत. श्रद्धा लोकांसोबत जवळीक वाढवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असे. तसेच, काही लोकांचे खासगी व्हिडिओ बनवून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करत असे. दबाव टाकून खंडणी किंवा पैसे उकळल्याचा संशय देखील वर्तवला जात आहे. परंतु, या गंभीर आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. या हायप्रोफाइल प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.

दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा २७ वर्षीय रेस्टॉरंट मालक शिवा शर्मा याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. लखनऊच्या हजरगंज परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ते खाली पडले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत शिवा शर्माची आई रंजना शर्मा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शिवा मागील काही महिन्यांपासून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रद्धा दुबे हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

श्रद्धा दुबे मागील काही महिन्यांपासून शिवाला सतत ब्लॅकमेल करत होती, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती आणि तिच्यासोबतच राहण्यासाठी दबाव टाकत होती. कुटुंबीयांचा आरोप आहे की, आरोपींनी आधी शिवाला डांबून त्याला अमानुष मारहाण केली. शिवाच्या शरीरावर गंभीर जखमा, तुटलेला जबडा, तसेच सिगरेटने पोळवल्याच्या खुणा होत्या. यानंतर त्याला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आले, असा आरोप कुटुंबीयांनी केला. या घटनेनंतर श्रद्धा दुबे फरार आहे.

पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा केला भांडाफोड; हॉटेलमधून अभिनेत्रीची सुटका…

मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय…

विवाहीत प्रियकरच निघाला मॉडेल शीतल हिचा खूनी…

प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह…

मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!