मुंबई पोलिसांकडून मनसेच्या नेत्याला अटक; अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक…

मुंबई: पवईत बनावट लीज डीड प्रकरणात मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 2) अटक केली आहे. हिरानंदानी ग्रुपच्या संचालिका अलका भाटिया उर्फ अलका हिरानंदानी यांची बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केल्याचा आरोप गणेश चुक्कल यांच्यावर करण्यात आला आहे. अलका हिरानंदानी या अभिनेता अक्षय कुमारच्या बहिण आहेत.

पवईमधील फ्लॅट नं. 3505, ओडोनियो बिल्डिंगसाठी 30 वर्षांची बनावट लीज डीड तयार केल्याचा गणेश चुक्कल यांच्यावर आरोप आहेत. गणेश चुक्कल विरोधात C.R. No. 978/2022 नुसार IPC कलम 420, 465, 467, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेश चुक्कल यांना न्यायालयात हजर केले असता 5 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपासासाठी पवई पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण पवईतील ‘अडोनिया’ इमारतीमधील एका फ्लॅटशी संबंधित आहे. ही मालमत्ता ‘मेलरोनिया हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’च्या मालकीची आहे. अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया हीरानंदानी, कमल निरंजन हीरानंदानी आणि श्रीधर नारायण हे या कंपनीचे संचालक आहेत. एफआयआरनुसार (FIR), 2018 मध्ये ‘ब्राइस इन्फ्रास्ट्रक्चर’चे तत्कालीन संचालक गणेश चुक्कल यांनी हा फ्लॅट आणि त्यासोबत दोन पार्किंगच्या जागा 26 महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. या कराराच्या अटींनुसार 15.30 लाख रुपये अनामत रक्कम (सिक्युरिटी डिपॉझिट) आणि 2.55 लाख रुपये मासिक भाडे निश्चित करण्यात आले होते. तसेच भाडे भरण्यास उशीर झाल्यास त्यावर 12% वार्षिक व्याज आकारण्याची तरतूदही करण्यात आली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 पासून कंपनीला भाडे मिळणे बंद झाले. चुक्कल यांनी सुमारे 2.67 लाख रुपयांची थकीत रक्कम जानेवारी 2020 पर्यंत भरण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात ती रक्कम कधीच भरली गेली नाही. परिणामी, 2020 मध्ये कंपनीने हा करार रद्द केला आणि फ्लॅट रिकामी करण्यास सांगितले.

एफआयआरनुसार, फ्लॅट रिकामी करण्याऐवजी चुक्कल यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले, ज्यामध्ये त्यांनी या मालमत्तेवर 30 वर्षांचा भाडेकरार असल्याचा दावा केला. तपासादरम्यान पोलिसांना या करारात अनेक अनियमितता आढळून आल्या. मूळ भाडेकरारामध्ये तीन वर्षांचा कालावधी नमूद केलेला असताना, त्यात ‘थ्री’ (three – तीन) या शब्दाऐवजी ‘थर्टी’ (thirty – 30) असा बदल करण्यात आला होता. तसेच, या करारावर नोटरीचा अनुक्रमांक (serial number) नव्हता आणि नोटरीचा शिक्काही अस्पष्ट होता. या करारावर ‘मेलरोनिया हॉस्पिटॅलिटी’च्या तिन्ही संचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे, पवई पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हा एफआयआर 2023 मध्ये नोंदवण्यात आला होता. ही मालमत्ता कंपनीने NCLT (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) द्वारे संपादित केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अडोनिया इमारतीमधील हा फ्लॅट मूळतः ‘हीरानंदानी ग्रुप’चा भाग होता. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मधील दिवाळखोरी आणि निवारण प्रक्रियेनंतर, 2018 मध्ये ही मालमत्ता ‘मेलरोनिया हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’च्या ताब्यात आली. ही कंपनी रिकाम्या सदनिकांची देखभाल आणि भाडेकरारांचे व्यवस्थापन पाहते. विशेष म्हणजे, जन्माष्टमीनिमित्त पवई येथे आयोजित केलेल्या भव्य ‘दहीहंडी’ उत्सवामुळे मनसे नेते गणेश चुक्कल अलीकडेच चर्चेत आले होते. या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्यासह बॉलीवूड अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांसारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Video! पुण्यातील गावगुंडाकडून अभिनेत्रीला लुटण्याचा प्रयत्न…

मुंबईच्या आलिशान हॉटेलात वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून दोन अभिनेत्रींची सुटका…

मुंबई पोलिसांनी मोठ्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; अभिनत्रींची सुटका…

‘छावा’मध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप; धक्कादायक योगायोग…

देवाच्या कृपेने एका स्कॅममधून वाचले : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!