
दिवेआगर दुर्घटना! पोलिस ठाण्यात सुरु होती मीटिंग; फोन वाजला अन् नावांची यादी उघडताच…
पुणे : आळंदी येथील ‘विनर्स अॅकॅडमी’ या कोचिंग क्लासच्या 11th आणि 12th सायन्सच्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. आता या घटनेनंतरची आंळदी येथे शोककळा पसरली आहे. संबंधित घटना घडली त्यावेळी गुरुवारी 1 ऑक्टोबरला आळंदी पोलिस ठाण्यात नेमकी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी केळगावचे पोलिस पाटील असणारे युवराज वहिले देखील उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच दिवेआगर येथे गेलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि युवराज वहिले यांना मोठा धक्का बसला. कारण या सहलीला त्यांचा मुलगा राजवीर देखील गेला होता.
पोलिस ठाण्यात बैठक सुरू असतानाच नगराध्यक्ष प्रशांत कऱ्हाडे यांनी पोलिस निरीक्षक भीमा नरके यांना फोन करून ‘आळंदीतील आठ मुलांचा दिवेआगर येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे, तुम्ही तातडीने नगर परिषदेत या,’ असे सांगितले. ही माहिती कळताच बैठक रद्द करण्यात आली. युवराज वहिले यांनी ‘माझा मुलगाही याच सहलीसाठी गेला आहे’ असे उपस्थित असलेल्या पोलिसांना सांगितले. हे सगळं सुरू असतानाच व्हॉट्सॲपवर मृत मुलांच्या नावाची यादी आली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मृत्यू झालेल्या आठ विद्यार्थ्यांमध्ये आपल्या लेकाचं नाव पाहून त्यांना मोठा धक्का बसला. हा प्रकार पाहून पोलिस ठाण्यातील उपस्थित सर्वच अधिकारी आणि नागरिकांचे डोळे पाणावले.
View this post on Instagram
दरम्यान, विनर्स अकॅडमीतील 48 जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगरच्या सहलीसाठी गुरुवारी (ता. 2) पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. या गटात 25 मुले, 17 मुली व सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी समुद्रात उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यातून 8 विद्यार्थी पाण्यात ओढले गेले.
बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे, राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे, प्रणव बनसोडे.
हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…
गुहागरच्या समुद्रात कुटुंबातील तिघे बुडाले; एकाचा मृत्यू…
हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
खांबोली तलावात फर्ग्युसन महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी बुडाले
उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…
हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…

