
हात व मान जवळजवळ धडापासून वेगळे; इस्रायली दंतवैद्याने स्मित मछार यांचा वाचवला जीव…
तेल अवीवः फ्लायदुबई विमान अपघातातील नायक कॅप्टन स्मित मछार गंभीर जखमी झाले आहेत. जगभरातून त्यांच्या शौर्याची प्रशंसा होत आहे. उड्डाणादरम्यान सह-वैमानिकाने त्यांच्यावर एका धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि ते बेशुद्ध पडणार होते. तरीही, त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि विमानात असलेल्या १७४ लोकांचे प्राण वाचवले, असे त्या विमानातील एका इस्रायली दंतवैद्याने सांगितले. पेशाने दंतवैद्य असलेले मुसायेव शोटा, फ्लाइट एफझेड१०७३ च्या कॉकपिटकडे सर्वप्रथम धावलेल्या चार प्रवाशांपैकी एक होते. ओमानच्या सह-वैमानिकाने विमान क्रॅश लँडिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
संशयित हल्लेखोराला ताब्यात घेऊन नियंत्रणात आणण्यास मदत केल्यानंतर, शोता हे कॅप्टन मछारपर्यंत पोचणारी पहिली व्यक्ती होती. त्यांनीच मछार यांना तातडीचे वैद्यकीय उपचार दिले, त्यामुळे त्याचा जीव वाचण्यास मदत झाली.
इस्रायली माध्यमांशी बोलताना, शोटा यांनी तो भयावह क्षण आठवून सांगितले, “मी थांबलो नाही. काहीतरी चुकीचे घडत आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी धावलो.” त्यांनी सांगितले की, वैमानिकाची प्रकृती खूपच गंभीर होती आणि त्याच्या डोक्यातून व हातांमधून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते.
View this post on Instagram
ते म्हणाले, “विमानात मी एकटाच डॉक्टर होतो. रक्तस्राव थांबवण्यात मी यशस्वी झालो. विमान उतरण्यापूर्वी काही काळ वैमानिकाची प्रकृती बऱ्यापैकी स्थिर होती, पण नंतर त्याची प्रकृती खालावली.” शोता यांनी सांगितले की, वैमानिकाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.
ते म्हणाले, “त्यांच्या डोक्यावर आणि हातांवर खोल जखमा होत्या. जणू काही त्यांचे दोन तुकडे झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रक्तस्रावामुळे निश्चितच गंभीर होती. कॅप्टन मच्छार स्वतःच्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले असतानाही शुद्धीवर होते आणि त्यांच्याशी बोलत होते”.
“त्यांनी सांगितले की तो ३९ वर्षांचे असून त्यांना दोन मुले आहेत. हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांना शिवीगाळ केली,” असे त्यांनी वायनेटच्या पत्रकाराला सांगितले. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, कॅप्टन मछार संपूर्ण वेळ फक्त प्रार्थना करत होते आणि माझ्या संपर्कात होते. मला भीती वाटत होती, की आम्ही त्यांना खरेच गमावून बसू.”
दंतवैद्याच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियातील तबुक येथे विमानाने आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर एका सौदी वैद्यकीय पथकाने जखमी पायलटवर उपचार सुरू केले. “ते वाचले असून धोक्याबाहेर आहेत, हे मला त्यांच्याकडून समजले,” असेही या दंतवैद्याने सांगितले.
यानंतर, रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, विमानातील एक मोठे संकट टाळण्यास मदत केल्यानंतर जखमी झालेल्या कॅप्टन मछार यांच्या प्रकृतीवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
भारतीय वैमानिक जखमी होऊनही भिडला, 174 प्रवाशांचा वाचवला जीव…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…
तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…
पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…
भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

