बीड! प्रेमाच्या त्रिकोण अन् आईच्या प्रियकरावर गोळीबार…

बीड: प्रेमाच्या त्रिकोणातून मुलानं आईच्या प्रियकरावर गोळीबार केल्याची घटना गेवराई परिसरात घडली. यामध्ये शेख मुसा हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शेख मुसा हे गेल्या चार वर्षांपासून शंकुतला शिंदे हिच्यासोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी शंकुतला हिने मुसा यांच्यासोबत राहणे सोडले. ती पुन्हा तिच्या पहिल्या पतीकडे आणि मुलांकडे राहण्यासाठी गेली होती. याच कारणावरून मुसा आणि शंकुतला यांच्यात वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी रात्री मुसा हे घरासमोर बसले होते. त्यावेळी शंकुतला, तिचा मुलगा मंगेश, मुलगी हिना आणि करण राठोड हे कारमधून तेथे आले. यावेळी शंकुतला आणि मुसा यांच्यात बोलणे झाले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. करण राठोड याने मुसा यांच्या खांद्यावर हातातील कत्तीने वार केला. यानंतर मंगेश याने मुसा यांच्यावर गोळी झाडल्याचे सांगण्यात आले. ही गोळी मुसा यांच्या उजव्या मांडीला लागली. त्यामुळे ते जखमी झाले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुसा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहेत. गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.

प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…

प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्…

प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…

आयटी इंजिनिअर प्रेयसीला भेटायला पुण्यात आला अन् नको ते घडलं…

Video: युवतीला सहा प्रियकर! एका प्रियकराने सर्वांना रेस्टॉरंटमध्ये बोलावले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!