पुणे जिल्हा हादरला! माजी सरपंच महिलेसह दोघींचा मध्यरात्री झोपेतच चिरला गळा…

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दोन महिलांची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे बारामती तालुका आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

माजी सरपंच इंदुबाई मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) या दोन्ही महिला रात्री आपल्या घराबाहेर झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी दोन्ही महिलांचा गळा चिरल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

आज (मंगळवार) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि दोन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. या हत्येमागील नेमकं कारण काय होतं? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुना वाद होता? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले आहे. परिसरातील संशयित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मध्यरात्री अशा प्रकारे दोन वृद्ध महिलांची निर्दयीपणे हत्या झाल्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…

पुणे जिल्ह्यात महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला कळले अन्…

नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…

पुणे जिल्ह्यात क्रूरतेचा कळस! पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतलं ॲसिड अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!