
पुणे! युवक आणि युवती लॉजवर गेले अन् काही वेळातच…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या एका लॉजमध्ये युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
साक्षी गायकवाड आणि विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) यांची एकमेकांशी जुनी ओळख होती. २४ तारखेला सकाळी हे दोघेही हडपसरमधील एका लॉजमध्ये आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्यात अचानक कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण सुरू झाले. यानंतर विश्वास हा साक्षीला लॉजमध्ये सोडून रागाने निघून गेला. यानंतर नैराश्यातून साक्षीने त्याच लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
View this post on Instagram
दरम्यान, मुलगी बेपत्ता असल्याचा आणि तिच्या मृत्यूची माहिती समजताच साक्षीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. याप्रकरणी साक्षीच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. वडिलांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी विश्वास जगताप (देशमुख) याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि दोघांमधील कॉल रेकॉर्ड्स तपासण्याचे काम सुरू आहे.
पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…
पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
पुणे! प्रेयसीचा वाढदिवस लॉजवर साजरा केला अन् केली निर्घृण हत्या…
पुणे! व्यावसायिक आणि नृत्याचे कार्यक्रम करणारी युवती लॉजवर गेले अन्…

