पुणे! नवले पुलाजवळ रात्रीच्या अंधारात पुन्हा ब्रेक फेल झाल्याने थरार…

पुणे : पुण्यातील अत्यंत धोकादायक आणि अपघातांचे केंद्र ठरलेल्या नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे तो भरधाव वेगात समोरील ट्रकला जाऊन धडकला. यामुळे तीन ट्रक एकमेकांवर आदळले.
यावेळी झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, ३ ते ४ जण जखमी झाले आहेत.

अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या भीषण धडकेत एक व्यक्ती ट्रकच्या कॅबिनमध्येच आत अडकून पडली होती. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या भीषण अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनीही खाली उतरून भरपूर गर्दी केली होती. यावेळी नागरिक रात्रीच्या अंधारात अपघातातील जखमींना मदत करत होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाकड पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाती वाहने बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत केली.

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

पुणे! नवले पुलाजवळ ट्रकने तीन वाहनांना दिली जोरदार धडक…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!