
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; पाहा नवी नियमावली…
पुणे : प्रसाद आणि अन्नवाटप सुरक्षित व स्वच्छ ठेवण्यासाठी एफडीएकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अन्नदान करणाऱ्या गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
नोंदणी १२ महिने, तीन महिने किंवा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी घेता येणार आहे. तीन महिने आणि दहा दिवसांच्या नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क असणार आहे. गणेशोत्सव काळात प्रसाद आणि महाप्रसादाच्या दर्जाची एफडीएकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाणर आहे. अन्न तयार करताना अस्वच्छता किंवा घाणीचे प्रकार आढळल्यास एफडीएकडून कारवाई केली जाणार आहे. एफडीएच्या विशेष पथकांकडून दहा दिवस गणेश मंडळांच्या अन्नवाटपावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
View this post on Instagram
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून वाटप केला जाणारा प्रसाद आणि अन्न संपूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार अन्नदान व प्रसादवाटप करणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाला एफडीए कडे नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, ही नोंदणी नेमकी कोणी करावी, प्रक्रिया काय आहे आणि याचे निकष काय आहेत, यांबाबत मंडळांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. उत्साहाच्या या दहा दिवसांत महाप्रसाद आणि अन्नदानाच्या दर्जावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एफडीए (पुणे विभाग) कडून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके प्रत्यक्ष गणेश मंडळांना भेटी देऊन अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि अन्न शिजवताना पाळल्या जाणाऱ्या नियमांची थेट पाहणी करतील.
“अन्नदान करणाऱ्या प्रत्येक मंडळाला एफडीएकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मंडळांच्या सोयीसाठी ही नोंदणी १२ महिने, ३ महिने किंवा गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीसाठी घेता येईल. यातील ३ महिने व १० दिवसांच्या नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल,” अशी माहिती एफडीएचे सह आयुक्त दिगांबर भोगावडे यांनी दिली.
एफडीएच्या या अचानक आलेल्या नियमांमुळे मंडळांमध्ये गोंधळ असला, तरी प्रशासनाने नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अधिकृत वेब लिंक उपलब्ध करून दिली आहे. अधिकृत वेब लिंक:
https://foscos.fssai.gov.in/apply-for-lic-and-reg
अन्नवाटप करणाऱ्या सर्व गणेश मंडळांनी या लिंकवर जाऊन आपली सविस्तर माहिती वेळेत नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल…
पुण्यात ४ ट्रक पनीर-खवा जप्त; तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनाचा सर्वांत मोठा दणका!
पुणे पोलिस आयुक्त उतरले थेट रस्त्यावर, गणेश मंडळांना भेटी अन् सूचना…
मोठी बातमी! संतोष पंडित यांची रवानगी होणार कारागृहात…
पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

