सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे; पत्नीने सीसीटीव्ही बंद केले अन्…

नवी दिल्ली: दिल्लीच्या निहाल विहारमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय गुप्ता (वय ३१) यांच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे समोर आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयची पत्नी रेखाने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला होता. त्यानंतर रेखाचा भाऊ आणि वहिनी घरी आले आणि त्यांनी विनयला मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या विनयचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या प्रकरणी रेखासह चार जणांना अटक केली आहे. विनय हा लक्ष्मी पार्कचा रहिवासी होता आणि नोएडा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याने सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी 31 वर्षीय रेखाशी लग्न केले होते. त्यांना चार महिन्यांची जुळी मुले आहेत.विनयने आपल्या पत्नीला मुलाच्या अंगावरील फोडांवर औषध लावण्यास सांगितल्यानंतर तिने नकार दिला, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रेखा घरातून बाहेर पडली आणि तिने तिचा भाऊ राजू, वेदप्रकाश आणि वहिनी पूनम यांना बोलावले. विनयचे वडील प्रेमचंद आणि आई रेणू गुप्ता, त्याच घरात राहतात जिथे विनयची हत्या झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

विनयच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिने आणि तिच्या पतीने रेखाच्या आई-वडिलांना त्याला मारहाण न करण्यास आणि त्याच्याशी शांतपणे बोलण्यास वारंवार सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. आरोपींनी मुलाला बेदम मारहाण केली. त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी रेखा, राजू, वेदप्रकाश आणि पूनम यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

सॉफ्टवेअर इंजिनीअर युवती निर्वस्त्र अवस्थेत गेली मंदिरात अन्…

पुणे! सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीसोबत प्रियकराचं धक्कादायक कांड, दिल्या खेळण्यातील नोटा…

सॉफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य अन् अश्लील चित्रीकरण…

सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीचा मृतदेह पाहून पत्नीने मारली सतराव्या मजल्यावरुन उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!