
खवड्या डोंगर! पत्नी त्याला मुठीत ठेवत होती, जिवंत असताना दूरच राहिला…
छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत चांदगुडे कुटुंबातील कुणाल (वय १९), त्याचे वडील मुरलीधर (वय ४८) आणि आई संगीता (वय ४२) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चांदगुडे कुटुंबातील नेमका वाद काय होता, याबाबत आता नातेवाईकांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणालचे वडील मुरलीधर यांनी आपल्या मनाने लग्न केले होते आणि लग्नानंतर ते आई-वडील तसेच बहिणींपासून दूर राहू लागले, असा दावा कुणाल याच्या आत्याने केला आहे. पत्नीमुळे मुरलीधर कुटुंबापासून दुरावले होते आणि त्यांना आपल्या माहेरच्या कुटुंबीयांशी फारसा संपर्क ठेवता येत नव्हता, असा आरोपही आत्याने केला. त्यामुळे मुरलीधर आणि त्यांच्या आई-वडिलांसह बहिणींमध्ये अनेक वर्षांपासून अंतर निर्माण झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.
आत्याने सांगितले की, ‘मुरलीधर माझा भाऊ होता. त्याने त्याच्या मनाने लग्न केले होते. लग्नानंतर तो आई-वडिलांच्या घरी फारसा येत नव्हता. आम्हा बहिणींशीही फार बोलत नव्हता. त्याची पत्नी त्याला मुठीत ठेवत होती. तिने त्याला आमच्याशी बोलू दिले नाही. जिवंत असताना तो आमच्यापासून दूरच राहिला. काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाचे लग्न झाले होते. त्यावेळी मामा म्हणून मुरलीधर यांना लग्नाची पत्रिका देण्यात आली होती. वहिनीला घेऊन ये, असे मी त्याला सांगितले. त्यावर ती येणार नाही, मी एकटाच येईन, असे त्याने सांगितले. मी त्याला एकटा ये, पण घरात वाद करू नकोस, असे सांगून समजूत काढली होती.’
View this post on Instagram
मुरलीधर यांच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या शेवटच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या. मुरलीधर लग्नापासून आमच्याशी फार बोलत नव्हता. कधी आला तर थेट शेतात जायचा. आम्ही त्याला शेतातील वाटणी दिली होती. त्याने त्याचे शेत वाट्याने दिले होते. अवघ्या १५-२० दिवसांपूर्वी मुरलीधर घरी आले होते, अशी आठवण त्यांच्या वडिलांनी सांगितली. त्यांच्या आईची प्रकृती आणि परिस्थिती पाहून मुरलीधर यांनी घरातील कामात मदत केली. “आईला आता फार उठता-बसता येत नाही. तिची परिस्थिती पाहून त्याने भांडी घासली, आम्हाला भाजी करून खाऊ घातली आणि आमच्यासोबत छान गप्पा मारल्या,” असे सांगताना त्यांच्या वडिलांनी मुलासोबतच्या त्या शेवटच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, चांदगुडे कुटुंबातील या दुर्दैवी घटनेनंतर आता कौटुंबिक वादाची नेमकी पार्श्वभूमी काय होती, कुणाल मानसिक तणावात का होता आणि मुरलीधर गेल्या काही वर्षांपासून कुटुंबापासून का दुरावले होते, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
कुटुंबच संपलं! डोंगरावरुन पडून मृत्यू होण्यापूर्वी आई आणि लेकाचा काळीज चिरणारा संवाद…
हृदयद्रावक! मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आईनेही मारली उडी…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू…
हृदयद्रावक! मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यूनंतर पत्नीनेही संपवलं जीवन, चिमुकल्या झाल्या पोरक्या…
हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…
हृदयद्रावक! घरात मुलीच्या बारशासाठी लगबग अन् मातेने कवटाळले मृत्यूला…
हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…

