
पुणे! जुन्नरचा आरोपी ऐटीत म्हणाला, बघा बघा मी सायकलवरून चाललोय…
पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्याच्या कृत्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. हे संतापजनक कृत्य केल्यानंतर हा आरोपी पोलिसांना आणि गावकऱ्यांना गुंगारा देण्यासाठी निष्पापपणाचा आव आणत फिरत होता. मात्र, बघा बघा मी CCTV मध्ये दिसतोय… हे आरोपीचेच वाक्य त्याच्या मुळावर आले अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे या नराधमाचे बिंग फुटले.
पीडित मुलगी (वय ९) ही कांजण्या आल्यामुळे शाळेत गेली नव्हती. तिचे आई-वडील शेतात मजुरीसाठी गेले असताना नराधमाने चिमुकलीला सायकल शिकवण्याच्या बहाण्याने तिला जवळच्या ऊसाच्या शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. आई-वडील घरी परतल्यानंतर मुलगी न दिसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली.
View this post on Instagram
साहिल खैरे असे या आरोपीचे नाव असून तो बहिणीच्या घरी कामानिमित्त आला होता. बहिणीच्या घराच्या जवळच राहणाऱ्या चिमुकलीसोबत त्याची ओळख झाली होती. चिमुकलीला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. मुलगी बेपत्ता असल्यामुळे गावात लोक जमा झाले होते. आरोपीदेखील कोणतीही भीती न बाळगता सर्वांसोबत स्टूलवर बसून शोधण्याचे नाटक करत होता. पोलिस घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासत असताना सायकलवरून जाणारी एक व्यक्ती कॅमेऱ्यात दिसली. ते पाहून आरोपी स्वतःच मोठ्या ऐटीत म्हणाला, “बघा बघा मी सायकलवरून चाललोय. यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाचा पहिला क्लू मिळाला.
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
पोलिसांनी दुसऱ्या एका घरातील CCTV फुटेज तपासले. त्यात एक सायकल वेगाने डावीकडे वळताना दिसली, पण अंतर जास्त असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र, अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही फुटेजमधील सायकल आणि सायकलस्वाराची शरीरयष्टी हेरली. संशय बळावताच पोलिसांनी आरोपीला गाडीत टाकून गावात फिरवले अन् त्याच्याकडे चौकशी सुरू केली. आरोपीने मी मळ्यात गेलो होतो, असा दावा केला. परंतु, तो जर मळ्यात गेला असता तर कॅमेऱ्यात कैद झाला असता, हे एका गावकऱ्याने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. फुटेजमध्ये तो मळ्याच्या दिशेने जाताना दिसतच नव्हता.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीने पोलिसांना घटनास्थळी नेले. गुऱ्हाळाच्या शेजारी असलेल्या तागाच्या शेताजवळील एका पाईपखाली त्याने चिमुकलीचा मृतदेह लपवून ठेवला होता. पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! जुन्नरच्या पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं; घराबाहेर बोलावलं अन्…
नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…
नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…
नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…
पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

