राजस्थानमधून आरोपीने कुरिअरने मागवल्या तब्बल ४१ तलवारी अन्…

जालना : जालना शहरातील सुंदरनगर भागातील आरोपीच्या घरातून पोलिसांनी ४१ तलवारी जप्त केल्या असून, याप्रकरणी शेख माजेद शेख लतिफ नावाच्या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार आहे, राजस्थानातील अजमेरमधून आरोपीने कुरिअरने या तलवारी मागवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर खून आणि लुटमारीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. यापूर्वी देखील जालन्यामध्ये तलवारींच्या असाच साठा आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी चंदन जीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

जालना शहरात होत असलेले गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सहा संधू यांनी जालना शहरातील अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांचे विरुद्ध कडक व धोरणात्मक कारवाई करणे संबंधी सूचना केलेल्या आहेत. त्यावरून शहरातील गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या इसमांचे हालचालीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यादरम्यान पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी विरुद्ध कारवाईचा धडाका उडवून अवैध शस्त्रांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेली विविध प्रकारची तब्बल 41 घातक हत्यारे चंदनझिरा पोलिसांनी जप्त करून मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी निगराणीखाली ठेवलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख माजेद शेख लतिफ वय 23 वर्षे, रा. राबिया मशिदच्या मागे, डायमंड हॉलजवळ सुंदरनगर चंदनझिरा हा संशयास्पद हालचाली करीत असल्याचे दिसून आले होते. त्यावरून चंदनझिरा पोलिसांनी खबऱ्यामार्फत त्याचेबाबत सखोल माहिती घेऊन पाळत ठेवली असता शेख माजेद शेख लतिफ हा त्याचे राहते घरामध्ये धारदार तलवारी, खंजीर व चॉपर बाळगून असून, तो जालना शहरामध्ये अवैध गंभीर कृत्य करण्यासाठी तसेच दहशत पसरविण्याचे उद्देशाने लोकांना विक्री करण्याचे बेतात असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी पथकासह सुंदरनगर परिसरातील शेख माजेद शेख लतिफ याचे घरावर छापा मारून झडती घेतली असता त्याचे घरात अवैधपणे व गुन्हेगारी कृत्यासाठी, जन्मानास दहशत निर्माण करण्यासाठी लोकांना विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेल्या 22 धारदार तलवारी, 15 धारदार खंजीर, 4 धारदार चॉपर असे एकूण 41 घातक हत्यारे, ज्यांची किंमत सुमारे 1 लक्ष 34 हजार रुपये, जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला शेख माजेद याचा साथीदार इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख रा. इंदिरा नगर जालना याचा पोलीस शोध घेत आहेत.

पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…

भंडारा हादरलं! तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार…

हृदयद्रावक! पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन्…

धक्कादायक! खासगी ट्रॅव्हलमध्ये रात्रीच्या प्रवासादरम्यान महिलेचा दोनवेळा विनयभंग…

प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर आरोप; कंडोम फेकले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!