
प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…
पुणे : एका युवकाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड हा गेल्या चार दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री निकिता शिवाजी दनाने ही युवती एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. तिने पीजी चालकाला सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाची खोली राहण्यासाठी उपलब्ध करून दिली. गुरुवारी दुपारी दिनेश महादेव झांबरे हा पीजीमध्ये आला. त्याने सागरला भेटायचे असून निकिता ही माझी प्रेयसी असल्याचे सांगितले. सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे समजताच दिनेश थेट तिसऱ्या मजल्यावर गेला. काही क्षणांतच तिसऱ्या मजल्यावरून आरडाओरड ऐकू येऊ लागला. पीजीमधील कर्मचारी आणि इतर रहिवासी धावत वर पोहोचले असता सागर गायकवाड रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दिनेश त्याच्यावर लोखंडी रॉडने वार करत होता. हल्ला थांबवण्याचा प्रयत्न होत असतानाच आरोपीने निकितालाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सागर गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या निकितावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि निकिता यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. मात्र, शिक्षणादरम्यान निकिता आणि सागर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याचाच राग मनात धरून दिनेश याने सागर आणि निकितावर हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेत सागरवर लोखंडी रॉडने तब्बल १३ ते १४ वार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पळून जाणाऱ्या आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खून आणि हत्येचा प्रयत्न यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…
पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…
पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…
पुणे! सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीसोबत प्रियकराचं धक्कादायक कांड, दिल्या खेळण्यातील नोटा…
पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

