नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…

पुणे : पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भादलवाडी गावात बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत आजोबानेच अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आजोबाला तातडीने बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.

पीडित मुलगी ही अल्पवयीन असून बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग आहे. आरोपीला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. तरीही त्याने सर्व नातीगोती विसरून घरात कोणी नसताना या निष्पाप मुलीवर अत्याचार केला. हा भयानक प्रकार पीडित मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने तत्काळ भिगवण पोलिस ठाणे गाठले. आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शिवाजी चंद्रकांत दणाणे (वय ६७, रा. भादलवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा चुलता म्हणजेच मुलीचा आजोबा असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, घटनेचे गांभीर्य आणि पीडितेची परिस्थिती लक्षात घेऊन भिगवण पोलिसांचे पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडेगे यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ भादलवाडी गावात धाव घेत आरोपी शिवाजी दणाणे याला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत कडक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

नात्याला काळीमा! चुलतभाऊ अन् आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना…

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!