
जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रक घुसला; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू…
जेजुरी: पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ असलेल्या भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव ट्रक घुसला. यावेळी झालेल्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आषाढी वारीत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. वारकरी भोंगळे मळा परिसरातून जात असताना हा अपघात घडला. अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताच्या वेळी घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. आजूबाजूच्या नागरिकांनी आणि इतर वारकऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. या भीषण धडकेत इतर तीन वारकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींमध्ये देखील महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अपघात नेमका कसा झाला? ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे? याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, ज्ञानोबा माऊलींची पालखी आज सकाळी सासवडहून जेजुरीला जाणार आहे. या पालखीच्या आधी काही वारकरी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघतात. आज सकाळी हे वारकरी रस्त्यावरुन चालत असताना साहित्य वाहून नेणार एक ट्रक वारकऱ्यांच्या गर्दी शिरला. या ट्रकने पाठीमागून सहा वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हे सर्व वारकरी आनंदाच विठुनामाचा गजर करत चालत होते. मात्र, या अपघातानंतर घटनास्थळी किंकाळ्या आणि रडण्याचे सूर ऐकायला येऊ लागले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिसांनी शिकवला वारकऱ्यांच्या वेशातील चोरट्यांना धडा…
पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…
पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…
पुण्याचा ‘धडाकेबाज गन मॅन’ निर्दोष; खोट्या तक्रारींचे षड्यंत्र अखेर उधळले…
पुणे! जेसीबी मालकाने मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणामाची दिली धमकी अन् पोलिसांनी…

