नाशिक! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; आरोपी निघाला…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मोहनदरी (ता. कळवण) येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती. दरम्यान, हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही, असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

संबंधित विद्यार्थिनी जेव्हा सुट्टीनिमित्त आपल्या गावी गेली होती, त्याच काळात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संबंधित विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली आहे.

दरम्यान, आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आश्रम शाळेत दैनदिन आरोग्य तपासणी करताना एवढी मोठी बाब लक्षात का आली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

जालना हादरलं! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे सांगताच पालकांना बसला धक्का; आरोपी निघाला…

पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला अत्याचार; गरोदर राहताच…

साखरपुड्याच्या एक दिवस अगोदर मुलगी गरोदर असल्याचे आले समोर…

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!