
रिलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट….
सोलापूर: प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये (वय २५) हिने आपलं आयुष्य संपवले. सुरुवातीला तणाव आणि त्यातून झालेल्या वादातून रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होतं. पण, आता या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. पोलिसांनी रोहिणी पाराध्ये हिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवेढा येथील रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येनंतर तब्बल 25 दिवसांनी रोहिणीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी पाराध्ये हिनं आपल्या हॉटेल ग्रामपंचायत या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर रोहिणीच्या आत्महत्येचं कारण शोधलं जात होतं. याबाबत पोलिसांनी सीडीआर तपास देखील केला. मात्र, या प्रकरणात कुठलेच धागेदोरे हाती लागले नाहीत. पण, आता पोलिसांनी रोहिणीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ माजली आहे.
View this post on Instagram
रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिचे वडील बाळू शिवशरण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहिणीचा पती निलेश पारामध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निलेश पाराध्ये रोहिणी हिला तिच्या मनाविरुद्ध हॉटेलमध्ये काम करायला लावत होता. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळेच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रोहिणी पाराध्ये हिचा पती निलेश पाराध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, प्रसिद्ध रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक कारणं समोर येत आहेत. रोहिणीचा हा दुसरा विवाह होता. रोहिणीच्या खासगी आयुष्याबद्दल आता माहिती समोर आली आहे. निलेश पाराध्येला भेटण्याआधी रोहिणीचं लग्न झालं होतं. पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर रोहिणी निलेशला भेटली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला. पण, अलिकडे हॉटेल ग्रामपंचायतच्या सुरू झालेल्या आणखी दोन शाखा आणि कामाचा ताण वाढल्यामुळे दोघांमधील वाद वाढला, असं बोललं जात आहे. पण, रोहिणीच्या मृत्यूचं ठोस कारण समोर आलेले नाही.
रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…
धक्कादायक! प्रसिद्ध रिलस्टारने हॉटेलच्या स्वयंपाकघरात संपवलं जीवन…
धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…
सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…
नातेवाईकांचा आक्रोश होता हृदय पिळवटून टाकणारा; चिमुकल्यासह आईचा मृत्यू…
सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…

