
प्रियकर सक्षमचं घर का सोडलं? आंचलने सांगितलं धक्कादायक कारण…
नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली आहे. याच पार्श्वभूमीवर आंचल मामिडवारने धक्कादायक गोष्टी सांगितली आहे.
नांदेडच्या इतवारा परिसरात काही महिन्यांपूर्वी सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. आंचल मामीडवार या युवतीशी त्याचे प्रेमसंबंध होते. हेच प्रेमसंबंध आंचलच्या घरी मान्य नव्हते. आंचलचे भाऊ, वडील आणि इतर सहकाऱ्यांनी सक्षमला एकट्याला गाठून त्याला संपवले होते. त्यानंतर आंचलने घरच्यांच्या विरोधात जाऊन, प्रसंगी पोलिसांत साक्ष देऊन घरच्यांवर गुन्हा दाखल केला होता. सक्षमच्या मृतदेहाबरोबर लग्न करून संपूर्ण आयुष्य आता सक्षमच्या घरीच राहणार असल्याचे तिने सांगितले होते. नांदेडची ही घटना संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान आंचल आमच्या घरातून निघून गेल्याचे सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
View this post on Instagram
एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सक्षमची आई संगीता ताटे यांनी हा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला आंचल मामिडवार हिने उत्तर दिले आहे. आंचल मामिडवार म्हणाली, सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याने आपण घर सोडण्याचा निर्णय घेतला. ही बाब मी सक्षमच्या कुटुंबाला सांगितली मात्र त्यांनी विश्वास ठेवला नाही. पुढे काही चुकीचे घडले तरी सक्षमचे कुटुंबीय विश्वास करणार नाहीत म्हणून मी सर्वांना सांगून, पोलिसांना कल्पना देऊन घर सोडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः सोबत येऊन मला माझ्या वडिलांच्या घरी सोडले. सध्या मी वडिलांच्या घरी राहत आहे.
सक्षमच्या वडिलांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचेही तिने स्पष्ट केले. तिने सक्षमचे घर सोडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंचलला ट्रोल केले जात आहे. या टीका टिप्पणींबाबत तिने नाराजी व्यक्त केली. सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करू नये, असे आवाहनही आंचलने केले आहे.
आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करत घेतली थपथ अन् काही महिन्यातच…
नांदेड! युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा…
नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर…
प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…
पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

