पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू तर…

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. २० ते २५ जण जखमी असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात झाला आहे. बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता. साखरपुड्यासाठी वऱ्हाडी हे ट्रकमधून जात होते. धानीवरी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले असता त्याचवेळी समोरून एक भरधाव कंटेनर येत होता. अचानक कंटेनरचा मागील डब्बा निसडला. आणि ट्रकवर येऊन आदळला. कंटेनर आदळल्यानंतर आयशर ट्रक रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. या अपघातात एक दुचाकीस्वारही सापडला. मृतांची संख्या जास्त असल्यामुळे ओळख अद्याप पटू शकली नाही.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 165 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अपघातात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक जखमी आहेत. घटनास्थळी सगळीकडे भयानक असं दृश्य होतं. रस्त्याच्या बाजूला वऱ्हाडातील नातेवाईकांचा एकीकडे आक्रोश होता तर दुसरीकडे, जखमी लोकांना रुग्णवाहिकेत दाखल केलं जात होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहे. या अपघातातील जखमींवर सध्या चाचा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि रुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…

हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…

अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…

काळाचा घाला! पिंपरीतील मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!