पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…

जालना : जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पोलिस प्रशिक्षणार्थीचे नाव राम बबन काळे (वय 25 ) असे असून ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राम काळे हे नेहमीप्रमाणे रविवारी 8 मार्च रोजी सायंकाळी झोपले होते. पहाटे 4 :25 वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. राम काळे यांच्या वडिलांचेही काही वर्षापूर्वी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपतत्वावर राम काळे यांना पोलिस खात्यात नोकरी मिळाली होती. गेल्या वर्षभरापासून ते जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होते.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

राम काळे हे अतिशय शांत आणि मेहनती स्वभावामुळे सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई आणि बहीण असा परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबासह गावामध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…

मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…

Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…

सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!