पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच महिलेची हत्या…

पुणे: हडपसर-सासवड रस्त्यालगत असलेल्या वडकी परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने एकाने महिलेचा निर्घृण खून केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दिवे घाटाच्या पायथ्याशी, वडकी गावातील एका गोदामाशेजारील मोकळ्या जागेत ३ मार्च रोजी ३० ते ४० वर्षे वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या युनिट सहाने तपास सुरू केला होता.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी केली. या तांत्रिक तपासातून प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला) याची ओळख पटली आणि पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला, ज्यामुळे संतापलेल्या प्रकाशने तिचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.

पुणे! दोन युवा शिवभक्तांवर मध्यरात्रीच्या सुमारास काळाने घातली झडप…

पुणे! लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं…

पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…

पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!