पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…

पुणे : भिगवण (ता. इंदापूर) प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली होती. यानंतर मुलीची आई बारामती पोलिस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित युवतीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केले. यानंतर संबंधित युवतीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, मुलाची चौकशी करुन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

भिगवण घटनेतील युवतीला न्यायालयात हजर केल्यानंतर तिचा जबाब नोंदवला गेला. जबाब नोंदवल्यानंतर मुलीचे मेडिकल करून पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. युवक आणि युवती भिगवममधून बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले होते.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती दिली. मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणही ऐकून घेतले आहे. त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपले म्हणणं मांडले आहे. मात्र तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्याने आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत. संबंधित युवतीने कोर्टासमोरही तिचं सगळं म्हणणं मांडले आहे.

शिवाय, संबंधित युवतीने एक प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होते. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असे म्हटले आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचेही युवतीने प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…

भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…

भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…

भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!