हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…

छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या सुशांत संतोष भोजने (रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुशांत भोजने हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस भरतीसाठी कठोर सराव करीत होता. दररोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात असे. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे सराव करण्यासाठी घराबाहेर पडला होता. परंतु, तो परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने पाचोड पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु मंगळवारी दुपारी राहटगाव शिवारात मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृत्यूदेह आढळून आला आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली. मात्र यावेळी नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली असता मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. सुशांतचं पोलिस भरतीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. पोलिस अज्ञात वाहनाचा तपास करत आहेत.

शिक्षिकेची हृदयद्रावक सुसाईड नोट; तीन महिन्यांच्या चिमुकलीने मुखाग्नी द्यावा अन्…

हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…

हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…

महाराष्ट्रात बेरोजगारी! MBA, MCA झालेले उच्चशिक्षित युवक पोलिस भरतीसाठी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!