पुणे शहरातील आरोपींना प्रथमच कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन आरोपींना शिवाजीनगर न्यायालयाने प्रथमच कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा सुनावली आहे. मा. श्री. विक्रमसिंह भंडारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर कोर्ट यांनी हा महत्वपूर्ण आदेश दिला आहे.

२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता पोलिस अंमलदार मखरे आणि तायडे गस्त घालत असताना पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमागे सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती नशापाणी करून गैरवर्तन करताना आढळले. त्यांची नावे विनोद वसंत माकोडे (वय ३२, रा. सांगवी खुर्द, अकोला) व सागर रामकृष्ण बोदाडे (वय ३६, रा. सदर) अशी आहेत. तक्रारीनुसार, दोघांवर अदखलपात्र गु.र.नं. ३५३/२०२५ व ३५४/२०२५ भादंवि कलम ३५५ अंतर्गत ३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन्ही आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या विरुद्ध दाखल खटले (क्र. १९९०२७/२०२५ आणि १९९०१७/२०२५) चालवून न्यायालयाने प्रत्येक आरोपीस ४ दिवस, दररोज ३ तास सामुदायिक सेवा करण्याचा आदेश दिला. ही सेवा शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या अंमलदारांच्या देखरेखीखाली पार पाडावी, असेही न्यायालयाने नमूद केले. ही शिक्षा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४-क, दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ अन्वये देण्यात आली असून, अशाप्रकारची शिक्षा पुणे शहरातील आरोपींना प्रथमच सुनावली गेली आहे.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेश बनसोडे, पोलिस उप-आयुक्त, परि. १, पुणे शहर, कृषिकेश रावले, सहा. पोलिस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर. साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मा. पोलिस निरीक्षक (गुन्हे), धनंजय पिंगळे यांचे सुचनेप्रमाणे पोलिस अंमलदार सुधीर घोटकुले, मखरे, तायडे व कोर्ट अंमलदार कांबळे यांनी केली आहे.

पुणे! रिक्षाचालकाचं निर्दयी कृत्य ५ महिन्यांनी उघड, थेट दिल्लीतून अटक…

पुणे ग्रामीण पोलिस दलातील निखिल रणदिवे बेपत्ता होण्याचे कारण समोर…

पुणे! तुला आणि तुझ्या मालकाला जिवंत सोडणार नाही अन् हल्लेखोराचाच मृत्यू…

पुणे पोलिस दलातील धडाडीचे अधिकारी राजू बहिरट यांचा गौरवशाली प्रवास…

पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!