
पुणे! आंबेगाव पोलिस स्टेशनच्या पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील आंबेगाव पोलिस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी करताना चैन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला जेरबंद करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.
फिर्यादी हे ०२/०५/२०२५ रोजी रात्रीच्या वेळी जुना सातारा पुणे रोड वरील गुजरवाडी जवळ त्यांची मोपेड गाडी ही रस्ताच्या कडेला पार्क करून झोपलेले असतांना फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व त्यांची मोपेड गाडी ही चोरट्याने चोरुन नेली होती. त्या बाबत आंबेगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा पोलिस अंमलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे हे शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी आकाश नरहरी शिंदे (रा. जाधवनगर, वडगाव बु पुणे) याने केला असल्याची माहिती मिळवली. तो दरी पुलाच्या जवळ येणार
असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने व पोलिस उप निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून ताब्यात घेतले आहे.

आरोपीने आंबेगाव, सिहगड पोलिस स्टेशन, पुणे शहर तसेच बावधन पोलिस स्टेशन (पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय) हददीत चैन स्नॅचींग (जबरी चोरी) केले असल्याचे तसेच तो खडक पोलिस स्टेशन कडील चैन स्नॅचींगच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरच्या अटक आरोपी याचे कडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून आंबेगाव व सिहगड पोलिस स्टेशन कडील वर नमुद चैन स्नॅचींग गुन्हयातील सोन्याचा मुद्देमाल व आरोपी याने गुन्हा करण्यासाठी यापरलेली मोपेड गाडी असा ३,९२,०००/-रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मिलींद मोहिते, पोलिस उपआयुक्त परिमंडळ – २ पुणे शहर, राहुल आवारे, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनचे शरद झिने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलिस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन
कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, प्रमोद भोसले, राकेश टेकवडे यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…
पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…
पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप…
पुणे शहरात दरोडा टाकणाऱ्या महिला दरोडेखोर टोळीस शिताफीने केले जेरबंद…
पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…

