उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; आरोपीला अटक…

सोलापूर : उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. राणा सूर्यवंशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये सुरू केलेल्या मोठ्या सामाजिक कामामुळे ते लोकांच्या मनात ठसले होते. त्यातूनच हा प्राणघातक हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

राणा सूर्यवंशी नेहमीप्रमाणे कामानिमित्त सोलापूर दौर्‍यावर होते. अक्कलकोट दर्शन करून येत असतांना त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाला. हल्लेखोरांच्या हातात पिस्तूल आणि धारदार शस्त्र होते. बुलेरो जीप क्रमांक MH 42 24 29 या गाडीमधून आरोपी आले होते. या आरोपींमध्ये सचिन लालू राठोड (रा. मुळेगाव तांडा, सोलापूर), आकाश मधुकर चव्हाण, कृष्णा फुलचंद पवार (दोघेही राहणार वडजी कॅनल तांडा) आणि अविनाश शिवाजी राठोड (राहणार बक्षी हिप्परगा तांडा) हे चौघेजण सहभागी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राणा शिपिंग कंपनीचे चेअरमन म्हणून उद्योगपती राणा सूर्यवंशी हे राज्यभर परिचित झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील पाऊलवाटा आणि सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राणा सूर्यवंशी यांच्यासोबत असलेले पोलिस कॉन्स्टेबल वामन पिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अक्कलकोट पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, “या घटनेची आम्ही बारकाईने चौकशी करत आहोत. घडलेल्या प्रकाराचे काही नवे पैलू समोर येतात का याचीही चौकशी सुरू आहे.”

दरम्यान, यापूर्वीही राणा सूर्यवंशी यांच्यावर सामाजिक कार्यातूनच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात आपल्या सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध आहेत. अलीकडे राणा शिपिंगच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले मोठे काम राज्याच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. राणा सूर्यवंशी यांनी स्वतः सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यामध्ये काही नक्षली कलेक्शन आहेत काय? याचाही तपास पोलिस करत आहे.

कर्जाचा ओझं! पत्नीची आत्महत्या अन् अंत्यसंस्कारानंतर पतीने लावला गळ्याला दोर…

विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या बाबा चैतन्यनंदच्या आवळल्या मुसक्या…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!