लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

सोलापूर: लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. याघटनेत अनमोल केवटे (वय ३७, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले, चाकू गळ्यात आरपार घातला तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनमोलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सोनालीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल व सोनाली हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूरला आले होते. परत सोलापूरकडे जात असताना या दोघांवर हल्ला झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे (वय ३४, रा. मंद्रूप, द. सोलापूर) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर (वय ३२ रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १२:४५ वा. खाडगाव रोड, लातूर येथे घडली.

कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे (वय २८, खडकगल्ली, बाळे) याने लातूर येथील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये घटनेची फिर्याद दिली आहे. यातील मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे बुधवारी अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते. बैठकीनंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले. पाच नंबर चौक, खाडगाव रोडने औसाकडे येताना जीप (एम.एच.२६/ व्ही. २३५६) ओव्हरटेक करत असताना कट लागला. यावेळी चालकाने शिवी दिली. त्याला अनमोल केवटे यानेही दमबाजी केली. पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्यावर आडवी केली. केवटे व सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले. त्यावेळी बाचाबाचीनंतर दोघांत झटापट झाली. दुसरा व्यक्ती गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला. समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोसकले. केवटे जागेवरच कोसळले. तोपर्यंत सोनाली व दुसरा व्यक्ती एकमेकांचे केस धरून एकमेकांना मारत होते. चाकूने त्यांच्यावरही पाठीत, पोटात वार करण्यात आले. या प्रकरणी दोन अनोळखी आरोपीवर बीएनएस ३६७/२५ कलम १०३(१), १०९(१), १२६(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जिरगे अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जीप रस्त्यात आडवी लावून अनमोल केवटे आणि त्याची मैत्रीण सोनाली भोसले यांच्याशी वाद घातला. वाद वाढताच दोघेही कारमधून खाली उतरले. याच क्षणी हल्लेखोरांनी जवळील धारदार चाकूने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर वार केला. गंभीर जखमी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर सोनालीवर हल्ला करत तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत तीही जमिनीवर पडली. हल्ला करून आरोपी तात्काळ पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ…

अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!