
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील तडजोडी पात्र प्रलंबित तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षकार, वकील मंडळी तसेच नागरिकांनी १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून निकाली काढावे, असे आवाहन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील यांनी केले आहे.
१३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी घाटंजी न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी, दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकील ॲड. डी. पी. बोरसे, घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. निलेश चवरडोल, सचिव ॲड. शुभम धुमाळ, माजी अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, माजी सचिव ॲड. सादीक खान, घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे, पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप नरसाळे या सह घाटंजी व पारवा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक, जमादार, पोलिस कान्स्टेबल आदी उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार घाटंजी न्यायालयासह यवतमाळ जिल्ह्यात व इतर तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रलंबित तडजोडी पात्र प्रकरणे, निगेशिऐबल ईन्स्ट्रुमेंट ॲक्ट चेक बांउस व इतर प्रकरणे, बॅंकेचे कर्ज वसुली प्रकरणे, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी विज बिल प्रकरणे, मालमत्ता विवाद प्रकरणे आदीं प्रकरणे १३ सप्टेंबर २०२५ रोजी तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी जास्तीत जास्त खटले सामोपचाराने सोडविण्यासाठी ९० दिवस मध्यस्ती मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहे. ‘देशासाठी मध्यस्ती’ या घोषवाक्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यातील न्यायालयात ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्या नुसार १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे, असे न्यायमूर्ती पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त वादपुर्व प्रकरणे तडजोडी साठी ठेवावे, असे आवाहन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील यांनी केले आहे.
पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…
प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…
Video: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन राडा, 18 आंदोलकांचा मृत्यू…
कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…

