
पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकाचं प्रेमप्रकरण अन् बिंग फुटेल म्हणून…
छत्रपती संभाजीनगर: स्वतःचे प्रेमप्रकरण उघड होऊ नये म्हणून एका पोलिस भरती प्रशिक्षण अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटना शनिवारी दुपारी 2:30 वाजता सिल्लोड शहरात घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सिल्लोडच्या ‘हिंदवी करिअर अकॅडमी’मध्ये अमोल गजानन मक (वय २०) हा युवक गेल्या एक वर्षांपासून पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव याचे अकॅडमीतील एका प्रशिक्षणार्थी मुलीवर प्रेम जडले. या प्रेमप्रकरणात जाधव अमोलचा वापर करत होता, पण दोघांमध्ये बिनसल्याने जाधवने अमोलला अकॅडमीतून काढून टाकले.
जाधव आणि संबंधित मुलीच्या प्रेमप्रकरणाचे व्हॉइस रेकॉर्डिंगचे पुरावे अमोलकडे होते. हे पुरावे व्हायरल झाले तर आपले बिंग फुटेल या भीतीने दशरथ जाधव याने अमोलच्या अपहरणाचा कट रचला. त्याने अकॅडमीतील दोघा मुलांना दुचाकीवरून केळगावात पाठवले आणि अमोलला घाटात बोलावले. तेथे दबा धरून बसलेल्या जाधव आणि त्याच्या मित्रांनी अमोलला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि पुराव्यांची मागणी केली. अमोलने पुरावे देण्यास नकार दिल्यावर त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले.
अमोलचे अपहरण करून त्याला सिल्लोडकडे घेऊन जात असताना, त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला कारमध्ये पाहिले. त्याने तात्काळ सिल्लोड ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने भराडीजवळ सापळा रचला आणि चारही आरोपींना पकडले. अमोल मक याच्या फिर्यादीवरून दशरथ विठ्ठल जाधव (संचालक, हिंदवी करिअर ॲकॅडमी, सिल्लोड), गणेश कृष्णा जगताप (मित्र, रा. वडोदचाथा), गणेश सोनुसिंग चव्हाण आणि प्रवीण लालचंद राठोड (दोघेही रा. कोहाळातांडा) या चार जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…
प्रेमप्रकरणाचा ट्रँगल! डॉक्टरने पत्नीला रंगेहाथ पकडले अन् केला भयंकर शेवट…
प्रियकराला तीन बायका तर प्रेयसीला दोन नवरे; अन् पुन्हा प्रेमसंबंध…
धक्कादायक! प्रेमीयुगलाची हत्येपूर्वी काढली होती गावातून धिंड…
नाशिक! प्रेमसंबंध ठेवण्यास भाग अन् गळ्यात हात टाकलेला फोटो केला शेअर…

