पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह जेरबंद केले आहे. अभिषेक राजू टेंकल असे आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पोलिस अंमलदार सचिन जाधव यांना ०७/०८/२०२५ रोजी गुप्त बातमीदारा कडून बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल शेजारी गल्ली, एफ सी रोड या ठिकाणी रेकार्ड वरील गुन्हेगार अभिषेक टेंकल हा उभा असून त्याच्या जवळ गावठी पिस्टल आहे. पोलिस उप-निरीक्षक अजित बडे यांनी महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांना माहिती कळविली असता त्यांनी योग्य त्या सुचना देऊन योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पोलिस उप-निरीक्षक अजित बडे हे त्यांचा पोलिस स्टाफ व दोन पंचाना पाचारण करुन पोलिस स्टेशन येथे स्टेशन
डायरी नोंद करुन वर नमूद पोलिस स्टाफ, पंच असे रवाना झाले.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल शेजारी गल्ली, एफ सी रोड येथे जाऊन थोडे आड बाजूस थांबून पाहिले असता आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाटलाग करुन शिताफीने पकडले. अभिषेक राजू टेंकल (वय २३ वर्ष रा. प्लॉट नंबर ४१ विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर रेल्वे
स्टेशनजवळ, शिवाजीनगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ३६,०००/- रु. कि.चा एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक राऊड मिळून आल्याने शिवाजीनगर पो.स्टे.गु.र.नं. १२४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) महाराष्ट्र पोलिस अधिनियम क.३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेश बनसोडे पोलिस उप-आयुक्त, परि ०१, पुणे शहर, कृषिकेश रावले, सहा. पोलिस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) धनंजय पिंगळे यांचे सुचना प्रमाणे पोलिस उप-निरीक्षक अजित बडे व पोलिस अंमलदार दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव, दिपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी केली आहे.

पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

पुणे! Z ब्रीजजवळ भडकलं टोळीयुद्ध, कोयत्याने प्राणघातक हल्ला…

पुणे! बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मोकामधील आरोपी जेरबंद…

पुणे! दरोडेखोरांकडून वॉकी-टॉकीचा वापर; १२०० किलोमीटरपर्यंत माग काढत केली अटक…

पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!