
बिअर बारमध्ये बसून शासकीय फाईल घेऊन दारू ढोसणारे अधिकारी कोण हे होणार उघड…
नागपूर: एका बारमध्ये अधिकारी सरकारी फाईली घेऊन बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील एका परमीट व बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसून चर्चा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी चौकशी सुरू केली असून या फाईल्स सरकारी कार्यालयातीलच असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
नागपूर शहरातील मनीष नगर भागात असलेल्या कीर्ती बारमध्ये हा प्रकार घडल्याचे पुढे आले. दुपारच्या सुमारासचा कीर्ती बारमधला हा व्हिडिओ असल्याचा दुजोरा नागपूर पोलिसांनी दिला आहे. या बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून वरिष्ठ पातळीवर याची चौकशी सुरु आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती बसलेले दिसतात, त्यातील एक जण दारुचे घोट घेत शासकीय फायलींवर पडताळताना व्हिडीओमध्ये दिसून येतो. सरकारी कार्यालयातील शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले ‘हे’ अधिकारी कोण होते, ‘ते’ कोणत्या विभागाचे होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळणी किंवा चर्चा करत होते, याबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. या प्रकारचा तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शकता वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती, नेर येथील एमएससीबीच्या कार्यालयातील महिला अधिकारी वसुलीसाठी गेल्या असता ऑन ड्युटी धाब्यावर ओली पार्टी केल्याचे समोर आले आहे. यावेळी महिला कर्मचारी मद्यप्राशन करून अर्वाच्च भाषेचा वापर करीत आहे. इतकेच नव्हे तर आपल्या चार ते पाच कनिष्ठ कर्मचाऱ्यांसमोर मालखेडीतील अभियंता यांना घासही भरवीत आहे. हा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सोशल मीडियावर गावातील एका ग्राहकाने व्हायरल केला आहे. जिल्ह्यात या महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…
आईच्या नात्याला काळीमा; तीन मुलींचा घेतला जीव…
पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया…
महाराष्ट्र हादरला! नामांकित संस्थेत HIV बाधित मुलीवर अत्याचार अन् गर्भपात…
गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीची परवानगीही ग्राह्य धरली जाईलः पोलिस आयुक्त

