अमरावतीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची क्रूरपणे हत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या…

अमरावती: अमरावती शहरातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एएसआय कलाम हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2ने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22) आणि आवेज खान अयुब खान (वय 22) असे या आरोपींची नावे आहेत.

अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!

पोलिस अधिकारी अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी का आणि कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप कळू शकलेले नाही. परिणामी पोलिस आता त्या दिशेने ही कसून चौकशी करत आहेत. अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर असे हत्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. कलाम यांच्या दुचाकीला आरोपीने प्रथम चार चाकी वाहनाने धडक दिली. त्यानंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. घटना घडल्यानंतर हल्लेखोर फाजील खान घटनास्थळावरुन पसार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण पोलिस विभागसह अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत आरोपीचा शोध घेतला असता त्याला ख्वाजानगरमधून जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या हत्येमागचे नेमकं कारण काय? हे अद्याप समोर आले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी कलाम हे अमरावती पोलिस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कलाम यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये कलाम हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी भेट दिली. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना करण्यात आले होते. अशातच आता आरोपी फाजील खान साबीर खान याला स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिस अधिकाऱ्याची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, पाहा नावे…

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या…

पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!