
अभिमानास्पद! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट…
हैद्राबाद (तेलंगणा): तेलंगणातील नारायणपेटचे पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांनी IAS झालेल्या कन्येला सॅल्यूट करून तिचे स्वागत केले आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, IAS उमा हरथी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांची कन्या उमा हरथी हिने UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यूपीएससी २०२२ मध्ये ऑल इंडिया थर्ड रँक मिळवले असून, संबंधित फोटो आता व्हायरल होत आहे.
उमाचा जन्म तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात झाला. उमाने आयआयटी हैदराबादमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले. पण, UPSC परिक्षा देऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते. वडिलांना गणवेशात पाहून तिला नेहमीच प्रेरणा मिळाली. उमाने चार वेळा यूपीएससी परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी निकाल निराशाजनक लागला. पण तिने हार मानली नाही. पाचव्या प्रयत्नात इतिहास रचला. देशात तिसऱ्या रँकसह तिची आयएएसमध्ये निवड झाली.
उमा ट्रेनिंगसाठी तेलंगणा पोलिस अकॅडमीत पोहोचली तेव्हा तिला तिचे वडील तिथे भेटले. पण यावेळी लेक सामान्य मुलगी नव्हती तर आयएएस अधिकारी होती. त्या भावनिक क्षणी, एन. वेंकटेश्वरलू यांनी लेकीला सॅल्यूट केला, तेव्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी आले आणि तो फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…
Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…
प्रेरणादायी संघर्षगाथा! कोल्हापूरच्या माळरानात मेंढरं राखून बिरदेव झाला IPS…
बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…
सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…
हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…

