
अहमदाबाद विमान अपघात! जळालेले मृतदेह अन् पायलटचा शेवटचा मेसेज…
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. तसेच या प्रवासांसोबत विमानात 11 लहान मुले देखील होती. या भीषण अपघातात सर्वांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिवाय, ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या ठिकाणच्या 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचं AI171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. टेक ऑफ केल्यानंतर आज (गुरुवार) दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी हे विमान रहिवासी भागात कोसळले. विमानतळाच्या धावपट्टीपासून काही अंतरावर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलच्या मेसवर हे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर आगीचा आगडोंब उसळला होता. घटनास्थळावर मृतांचा खच्च पडला होता. शिवाय, या स्फोटात मेसमधील २५ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from airport premises. More details are awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/qbO486KoEo
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
दरम्यान, एअर इंडियांचे हे विमान अहमदाबाद ते लंडन पर्यंत प्रवास करणार होते. दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केल्यानंतर मेघानी नगर परिसरात कोसळले. ज्यावेळी विमानाने रनवे वरून उड्डाण केल्यानंतर पायलटने 1o मिनिटातच हे विमानाच्या पायलटने एटीसी एक संदेश पाठवला होता. ज्यामध्ये त्याने Mayday Mayday असा संदेश पाठवला होता. याचा अर्थ आम्ही क्रॅश करत आहोत आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. विमान सुरक्षीत लँड करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले असे पायलटने एटीसीला सांगितले. त्यानंतर काही क्षणातच पायलटचा संपर्क तुटला होता.
विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश (मे डे कॉल) दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली.
अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…
Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…
भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…
Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…
स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

