
हृदयद्रावक! इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीचा तडफडून मृत्यू…
ठाणे : युवती घरात झोपली असताना मध्यरात्री मण्यार जातीच्या विषारी सापाने तिला दंश केल्याने तिचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. राणी हरिश्चंद्र निमसे (वय १९) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राणी निमसे ही शहापूर येथील आरमाईट कॉलेजमध्ये इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. मंगळवारी (ता. ३) रात्री ती आपल्या घरात झोपली होती. पहाटे तीनच्या सुमारास तिच्या पायाजवळ काहीतरी वळवळ झाली. काही कळायच्या आत तिला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला.
मुलीला सर्पदंश झाल्याचं समजताच मुलीच्या वडिलांनी तिला तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र, शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू बेड आणि इतर सोईसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन तातडीने ठाण्याच्या दिशेने निघाले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. युवतीचा झोपेत असताना अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात शहापूरमध्ये १४ वर्षीय मुलगा प्रेम सदगीर याचादेखील सर्पदंशाने मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी प्रेम क्रिकेट खेळत होता. यावेळी बॅटींग करणाऱ्या मुलाने बॉल मारल्यानंतर बॉल काही अंतर दूर गेला. यावेळी प्रेम बॉल आणायला गेला. याच वेळी एका विषारी सापाने त्याला दंश केला. यानंतर तो तातडीने घरी गेला. त्याने सर्पदंशाची माहिती घरच्यांना दिली. घरच्यांनी त्याला तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बराच वेळ त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाही. यातच त्याचा मृत्यू झाला होता.
हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण…
कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…
हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…
हृदयद्रावक! मुलाच्या पँटमध्ये शिरला कोब्रा अन् नको तिथे केला दंश…
हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…
पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…

