पुणे शहरात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; संपवलं जीवन…

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवकी प्रसाद पुजारी उर्फ दीपा (वय २२, रा. हडपसर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांना पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

मनासारखा हुंडा, मानपान न दिल्याच्या कारणावरुन सुनेचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यात येत होता. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नवऱ्यासह सासू, सासरे, दीर यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकी प्रसाद पुजारी (वय 22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून याबाबत दीपाचे वडिल गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात 18 एप्रिल रोजी दीपा व प्रसाद यांचा विवाह झाला. लग्न सोहळ्यात दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला 4 तोळे सोने दिले, यासह मानपानाप्रमाणे 10 लाख रुपये खर्च करुन लग्न करुन दिले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली. त्याच दिवसापासून प्रसाद व त्याची आई सुरेखाने लग्नात भांडी, फ्रीज दिला नाही, यासह मानपान केला नाही म्हणून वाद घालून तिला शिवीगाळ केली. दीपाने तिच्या वडिलांना ही हकीगत सांगून माहेर गाठले. परंतु, त्यानंतर दीपाच्या सासऱ्याने तिची समजूत घातली आणि तिला पुन्हा पुण्यात आणले. 18 मे रोजी दीपाने वडिलांना फोन केला व ती रडू लागली आणि लग्नात भांडी सामान दिले नाही म्हणून प्रसाद, दीर, सासू आणि सासरे शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर, दीपाच्या वडिलांनी मी पुण्यात येतो व वाद सोडवितो, असे सांगून तिची तात्पुरती समजूत काढली. पण, 19 मे रोजी दीपा हिने हडपसर मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!