वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…

भोपाळ (मध्य प्रदेश) : घराशेजारी राहणारा व्यक्ती महिलेला वहिनी बोलायचा. वहिनीला घेऊन त्याने पळ काढला. दोघे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण, महिलेला सोडून त्याने पुन्हा एकट्यानेच पळ काढला. महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित महिला 28 वर्षांची असून, तिचे पतीशी संबंध बिघडले होते. घरा शेजारी राहणाऱ्या रामराज केवट या प्रियकराने याचा फायदा घेत तिला सोबत घेऊन पळ काढला. दोघे तमिळनाडू राज्यातील कोईमतूरमध्ये येथे गेले. दोघे जण बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले; मात्र त्यानंतर तो अचानक तिला तिथेच ठेवून आपल्या घरी परतला. शिवाय, घरी येताना तिचा मोबाइल फोनही आपल्याबरोबर घेऊन आला. पीडित महिलाही नंतर त्याला शोधत त्याच्या घरी आली. तेव्हा आरोपी रामराज याची पत्नी आणि त्याच्या अन्य कुटुंबीयांनी पीडित महिलेला पकडून ठेवलं. तिला बेदम मारहाण केली. मध्य प्रदेशातल्या श्योपूर इथल्या वीरपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली.

पीडित महिलेला मारून टाकण्याच्या त्यांचा कट होता. पण, पीडित महिलेच्या मुलाने प्रसंगावधान राखून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर चौघांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने असा आरोप केला आहे, की आरोपी तिला मारून तिचा मृतदेह चंबळ नदीत फेकणार होते. पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला नाही; मात्र त्याच्या कुटुंबातल्या तीन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं, की आरोपीच्या कुटुंबातल्या महिलांनी पीडितेला मारहाण केली आहे. तसंच, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मारहाणीचा एक व्हिडिओही मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपींवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असून, अधिक तपास सुरू आहे.

वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना…

धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…

वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…

दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!