थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…

छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या मुलाचे (वय ७) दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. अपहरण झालेला मुलगा सुखरुप सापडला असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जालना येथील भोकरदन शिवारातून मुलाला ताब्याता घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अपहरण केलेल्या चेतन तुपेची 24 तासाच्या आत सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी मुलांसह अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. दोन कोटीच्या खंडणीसाठी मंगळवारी (ता. ४) रात्री आठ वाजता अपहरण केले होते. अपहरणानंतर 15 मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केली होती.

चेतन तुपे या चिमुकल्याचे अपहरण झाल्यानंतर बिल्डर तुपे यांना खंडणीसाठी फोन आला. तात्काळ त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी देखील तपास सुरू केला. अपहरणकर्ते ज्या गाडीत चेतनला घेऊन गेले. त्या गाडीचा अपघात भोगरदन तालुक्यात झाला. हा अपघातच पोलिसांसाठी मोठा क्लू ठरला. कारण गाडीचा अपघात झाल्यामुळे अपहरणकर्ते जास्त दूर जाऊ शकले नाही. त्यांनी जालन्यात ब्रह्मपुरीजवळ थांबण्याचे ठरवले. या अपघातात ड्रायव्हर जखमी झाल्याने त्याला भोगरदनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावरून पोलिसांना तपासाची चक्रे फिरवली. ब्रह्मपुरी गावाजवळ अपहरणकर्ते मुलाला शेतात बसल्याचे आढळले. त्यावेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुलगा सध्या सुखरूप आहे.

दरम्यान, सुनिल तुपे हे बिल्डर असून त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील कुटुंबासह एन-४ मधील सेक्टर एफ-1 मध्ये राहायला आहेत. काल सुनील तुपे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. यावेळी अपहरणाची घटना घडली. कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने फुटेजमध्ये कैद झाले नाही. कारचा क्रमांकही दिसून आला नाही. पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली 30 पोलिस अधिकारी आणि जवळपास 120 कर्मचारी या घटनेचा तपास करण्यात आला आहे.

शिवसेनेचे अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!