सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…

मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला होता. आरोपीने सैफच्या घरात घुसण्यापूर्वी घराची रेकी केली होती. मुंबई पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. आरोपीच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सैफ अली खान याच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजाद याने अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची घरं हेरुन आरोपीने रेकी केल्याची माहिती पुढे आली आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक घरांची रेकी केली असल्याची माहिती मिळत आहे. वांद्र्यातून एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालककडून या सेलिब्रेटिंच्या घराची माहिती आरोपीने मिळवली होती. त्यापैकी सैफ अली खान याचे घर आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्याने आरोपीने ते घर निवडले.

आरोपी सैफ अली खानचा मुलगा जहांगीरला (जेह) ओलीस ठेवून पैशांची मागणी करणार होता. पण, हे करत असताना घरातले सगळेच जागे झाल्याने आरोपी घाबरला आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीने अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैफ अली खानवर एकूण 6 वार आरोपीने केले आणि तिथून फरार झाला. आरोपीला बांगलादेशात पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता, त्यासाठीच पैश्यांची व्यवस्था आरोपी करत होता, अशीही माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे.

दरम्यान, सैफवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीने इमारतीतून पळ काढल्यानंतर तो बेदरकारपणे फिरत होता. हल्ला केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्यानंतर निवांतपणे झोपला. उठल्यानंतर त्यानं सर्वात आधी कपडे बदलले आणि तिथून चालत वांद्रे स्थानक गाठले. त्यानंतर तिथून दादरला आला, दादरहून वरळीला आला. वरळीत यापूर्वी काम केलेल्या कॅफेमध्ये रात्रभर थांबला. आरोपीला बांगलादेशला पळून जाण्यासाठी बनावट पासपोर्टची गरज होती. त्यामुळे त्याला पैसे लागणार होते. म्हणून तो कामाच्या शोधात होता. कामासंदर्भात एका व्यक्तीला भेटून आरोपी तिथून ठाण्याला निघून गेला.

अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…

अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…

करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!