पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

पुणे : एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीने मिळून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात घडली आहे. नागेश जाधव (वय २३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. नागेश जाधव आणि संबंधित अल्पवयीन मुलगी हे एकमेकांचे जुने मित्र होते. मात्र, त्यांच्या या ओळखीला आणि त्यांच्यात होणाऱ्या संवादाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. नागेश हा पुण्यातील शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करतो. नागेशची आई घरकाम करते. मृत नागेशच्या आईने केलेल्या खळबळजनक आरोपानुसार, त्या मुलीनेच नागेशला मोबाईलवरून मेसेज करून भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. नागेश तिला भेटण्यासाठी गेला असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला अन् त्याचा जीव घेतला. या हल्ल्यात नागेशचा जागीच मृत्यू झाला.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आपली मैत्री इतक्या टोकाच्या थराला जाईल आणि आपला जीव घेईल, याची कल्पनाही नागेशला नव्हती. मुलीच्या घरच्यांनी अत्यंत क्रूरपणे त्याचा जीव घेतल्याचा आरोप फिर्यादीमध्ये नागेशच्या आईने केला आहे. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला.

दरम्यान, 14 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नागेशला एक फोन आला. त्यानंतर तो तातडीने घरातून गाडी घेऊन निघाला. त्यानंतर रात्री 8 च्या सुमारास नागेशच्या फोनवरून एका व्यक्तीने त्याच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. तसेच आम्ही नागेशला मारलं असून त्याला घेऊन जा नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर आईने जेव्हा घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नागेशला खूप मारण्यात आले होते. नागेशने आईला झालेली घटना सांगितली. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच महिलेची हत्या…

पुणे! लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं…

पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!