आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे; असे म्हणून शासकीय कामात अडथळा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पवन पेटेवार याच्या विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. घाटंजी तालुक्यातील तलाठी बिरमोल रामकृष्ण तायडे (वय 54, रा. खापरी) यांचे कार्यालयात शासकीय काम करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार […]
अधिक वाचा...संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल; कारण…
यवतमाळ : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या प्रकरणी भाजप नेत्याने यवतमाळमध्ये राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लेखाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गटांमध्ये द्वेष वाढवण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील भाजपचे संयोजक नितिन […]
अधिक वाचा...सरपंचाने केला शौचालयास गेलेल्या महिलेचा विनयभंग…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाटापांगरा येथील एका 31 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पाटापांगरा येथील सरपंच आरोपी त्रिशुल अंकुश नागोसे (वय 29, रा. पाटापांगरा विरुद्ध 354, 354 (A), 506 अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे पारवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. आरोपी त्रिशुल नागोसे याच्या विरुद्ध Cr.P.C. 107 अंतर्गत […]
अधिक वाचा...यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : साखरतांडा येथील एका विधवा महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी जागेश्वर राठोड विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील साखरतांडा येथील एका 28 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी जागेश्वर सुभाष राठोड (वय 35, […]
अधिक वाचा...घाटंजी पोलिसांची मुर्ली येथील जुगार अड्डयावर धाड; आरोपींमध्ये शिक्षक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील मुर्ली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेतात (जागेवर) जुगार खेळताना पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. संशयीत आरोपी प्रविण दोनाळकर (वय 57, रा. नेहरु नगर घाटंजी), दिनेश खांडरे (वय 42, रा. राम मंदीर घाटंजी), अनिल कापसे (वय 49, रा. नेहरु नगर […]
अधिक वाचा...माजी आमदाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये तूतू-मैमै…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये तूतू-मैमै झाले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पांढरकवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत मराठी शाळेच्या मैदानावर 12 फेब्रुवारी 2019 रोजी कबड्डी सामने आयोजीत केले होते. सदर कबड्डी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी पांढरकवडा येथील वाय पॉईंटजवळ माजी आमदार […]
अधिक वाचा...मी आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे असे म्हणाला अन्…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार याच्या विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी तालुक्यातील तलाठी बिरमोल रामकृष्ण तायडे (वय 54, रा. खापरी) यांचे कार्यालयात शासकीय काम करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार (वय 55, रा. आनंद […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…
यवतमाळ : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त दोन मुली मामाच्या गावाला आल्या होत्या. परिसरात खेळत असतानाच तलावात पडल्या आणि दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मनदेव गावा येथील जेतवनमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रिया किशोर बिहाडे आणि काव्या धम्मपाल भगत अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलींची नावे आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…
यवतमाळ: आईने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. संबंधित दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेश्मा नितीन मुडे (वय 28) असे आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन […]
अधिक वाचा...पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…
यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर यवतमाळ च्या कोसादनी घटात पोलिसांच्या गाडीला आयशर गाडीने जोरदार धडक दिली आहे. यावेळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतांमध्ये एक पोलिस कर्मचारी आणि आयशरचा चालक असल्याची माहिती मिळाली […]
अधिक वाचा...
