हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे (रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. दहाच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी […]

अधिक वाचा...

कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत कोयता बाळगणा-या तडीपार आरोपीला तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे कडून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी यांचा शोध घेवून मिळून आल्यास कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे सहा. […]

अधिक वाचा...

खडक पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील खडक पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकीच्या डीकीमधुन तब्बल ११,५०,००० रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी यांचेवर पाळत ठेवून त्यांचे दुचाकीच्या डीकीमधुन रोख रक्कम रु ११,५०,०००/-रु सफाईदार पणे चोरी करुन नेल्याची घटना दिनांक ०२/०२/२०२४ रोजी खडक पोलिस स्टेशन हददीमधील टिंबर मार्केट परिसरात घडली होती. सदर […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; मुंढवा पोलिसांकडून सत्कार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रिक्षा चालकाने ०१ लाख १० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू मुंढवा पोलिस ठाणे येथे जमा केल्या होत्या. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी रिक्षा चालकाचे कामगिरीचे कौतुक त्यांचा सत्कार केला. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गरीब कष्टकरी रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे (सध्या रा. खराडीगाव, […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुणे पोलिस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर तीन ते चार गोळीबाराच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता पुणे पोलीस […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…

पुणेः पुणे शहरातील बुधवार पेठेत भरदिवसा एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यात खुनाचे सत्र सुरू असल्याचे खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन युवकांनी महिलेचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

लोणीकंद पोलिसांनी मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी गुन्हयातील व मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. खुन दरोडा जबरी चोरी घरफोडी इत्यादी सारख्या गंभीर गुन्हयामध्ये सहभागी असलेला आरोपी गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१) हा शिरगाव परंदवाडी पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तलयातील पोलिस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या […]

अधिक वाचा...

खडकी पोलिसांनी दोन महिलांना केली अटक; मुद्देमाल हस्तगत…

पुणे (संदिप कद्रे): अवैद्य रित्या गांज्या विक्री करणाऱ्या ०२ महिलांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले असून, २,२१,१३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंमली पदार्थ मुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने ०८/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई व अवैद्य धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी १७.३० […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…

पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औंधमध्ये शनिवारी (ता. १०) एकाने सहकाऱ्यावर गोळीबार करत आत्महत्या केली. बुधवार पेठेत शुक्रवारी (ता. ९) एकाने वस्ताऱ्याने व्यक्तीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर आज (रविवार) सकाळी मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात असलेल्या रेंज हिल परिसरात घडली आहे. गुंभाबाई शंकर […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लिलाकर असे आरोपीचे नाव असून त्याला सायबर गुन्ह्यात अटक केली होती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला त्याने धमकी दिली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!