रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी वर्णी पुन्हा लांबणीवर…
पुणे : महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आल्यामुळे रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदावरील वर्णी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे आज (रविवार) सेवानिवृत्त झाले. रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी जाईल, असे सांगितले जात होते. पण, सध्या विवेक फणसाळकर […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात सुहेल शर्मा यांना निरोप समारंभ!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरचे पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०३चे सुहेल शर्मा यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्याने पोलिस आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे हस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. निरोप समारंभास अपर पोलिस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) व पोलिस सह आयुक्त […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या….
मुंबईः आज ३१ डिसेंबर २०२३, वर्षाचा शेवटचा दिवस तसाच शेवटचा दिवस मुंबई पोलिस दलातील. ३३ वर्ष सेवा केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा. सेवा निवृत्ती कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्तांसमोर एक पोलिसकाकाच्या पत्नी ने आपल्या पती बद्दल ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या नक्की ऐकण्यासारख्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिक केंद्रीत पोलिसिंगवर भर दिला असून, त्यामध्ये आता ‘सुरक्षित नाशिक’ या संकल्पनेवर भर दिला आहे. यामुळे नाशिककरांना ‘सुरक्षित नाशिक’चा अनुभव घेता येणार आहे. नियंत्रण कक्ष, डायल ११२, पोलिस ठाणे, निर्भया पथक, दामिनी मार्शल्स या पथकांतील कर्मचाऱ्यांना ‘संभाषण कौशल्य आणि […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
मुंबई : कर्तव्यावरून आपल्या घरी जात असताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांताक्रुज पूर्व परिसरात घडली आहे. समीर सुरेश जाधव (वय 37) मृत पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या मृत्युमुळे पोलिसदलात हळहळ व्यक्त केली जात आहे. समीर सुरेश जाधव हे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. रविवारी (ता. २४) दुपारी ते साडेतीन वाजता कर्तव्यावरून आपल्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिस पाल्यांकरीता क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन!
पुणे (संदीप कद्रे): सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे शहर यांच्यावतीने पोलिस पाल्यांकरीता क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांना सहभाग नोंदवला होता, अशी माहिती अध्यक्ष भानुप्रताप बर्गे यांनी दिली. सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे ही संघटना सेवानिवृत पोलिस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुंटुबाच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी सन २०१९ रोजीपासून […]
अधिक वाचा...पोलिसकाकाच्या पत्राने पोलिस दलात उडाली खळबळ…
अहमदनगर : पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत दोन दिवसात पदोन्नतीची यादी न बदलल्यास आत्महत्या करेन, असे पत्र पोलिसकाकाने लिहिले असून, या पत्रामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये रामनाथ भाबड हे हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे निवेदन पोलिस अधिक्षकांना दिले आहे. शिवाय, पोलिस महासंचालक, विशेष […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…
जालना : जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे डांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी एरिया मध्ये राहणारे डांगे यांनी 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत. पोलिस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि […]
अधिक वाचा...आपल्या कर्तव्यामुळे नावारूपाला आलेले पोलिस अधिकारी अक्षय सोनवणे…
सातारा जिल्ह्यातील दहीवडी पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि अक्षय सोनवणे हे संयम आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले. परिस्थितीशी दोन हात केल्यानंतर यश आपोआपच मिळते. फक्त त्यासाठी लढावे लागते… अल्प परिचय… अक्षय सोनवणे यांचा पुणे जिल्ह्याच्या मातीत जन्म झाला. पुरंदर तालुक्यातील कोडीत हे सोनवणे यांचे मूळ गाव. परंतु, लहान पणापासून वारजे माळवाडी, पुणे शहर […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
पुणेः पोलिस अधिकारी (DYSP) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या जेनिफर ऍण्ड दि बीस्ट या पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) होणार आहे. सातारा येथेल दीपलक्ष्मी नागरी सहकारी पसंस्थेच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, […]
अधिक वाचा...
