पोलिसांनी पत्रकारांना रोखू नये: अजित पवार

पुणे : पोलिस बंदोबस्तामुळे पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहोचू दिले जात नाही, अशी तक्रार पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अजित पवार यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून घेतले आणि पोलिसांनी पत्रकारांना रोखू नये याबाबतच्या सुचना दिल्या. पत्रकारांनी पंधरा दिवसांपूर्वीच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी […]

अधिक वाचा...

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

घाटंजी यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली तसेच पोलिस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांचे कडुन प्राप्त झालेल्या निर्देशाप्रमाणे लोकसभा निवडणूक – 2024 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता जिल्हा स्तरावरील पोलिस आस्थापना मंडळाची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत आस्थापना मंडळाचे मान्यतेनुसार यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश जिल्हा […]

अधिक वाचा...

Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!

पुणेः पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले आहेत. यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला आहे. पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत तीन वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. 19 जानेवारी […]

अधिक वाचा...

राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द; पत्रकात म्हटले की…

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले असल्यामुळे राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. त्यामध्ये 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलिस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

पुणे (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले आहेत. बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…

मुंबई : मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलने टोकाचा निर्णय घेतला आहे. कैलास एकनाथ गवळी (वय ३९) यांनी नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रविवारी (ता. १४) सकाळी 8.30 च्या सुमारास जगाचा निरोप घेतला. नैराश्येतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला उचललल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कैलास एकनाथ गवळी यांना जवळच्या जेजे […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

परभणीः पोखर्णी-पाथरी मार्गावर रविवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर मारोतराव गवारे (वय ५६, रा. पाथरी) हे जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे. प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…

जळगाव: मुंबई पोलिस दलात कर्मचारी असलेले शुभम अर्जुन आगोणे (वय २८ रा. चाळीसगाव) यांचा क्रिकेट स्पर्धेच्या वादातून धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….

चाकण (पुणे) : चाकण पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार बाबूराव मानसिंग राठोड (वय ५०) यांचा ब्रेन हॅमरेज (मेंदूतील रक्तस्राव) झाल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. राठोड यांच्या मृत्युमुळे पोलिस दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे सोमवारी (ता. ८) रात्री ड्युटीवर […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाकाला ट्रकचालकांची लाठ्या काठ्याने मारहाण…

मुंबई : नवी मुंबईमध्ये ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, ट्रकचालकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आहे. एका जमावाने पोलिसावर लाठ्या काठ्याने हल्ला केला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरात तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. नवी मुंबईजवळच्या महामार्गावर एका पोलिसाला आंदोलकांनी घेरले आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!