पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…
पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस हवालदार सचिन नरोटे (वय ३८, रा. वाकड) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर ही घटना घडली आहे. अज्ञात वाहनचालक फरार असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलिस घेत आहेत. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…
चेन्नई (तमिळनाडू): तिरुमंगलमजवळील शिवराकोट्टई येथे विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर भीषण अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. शिवराकोट्टई येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून घसरलेल्या कारने आधी दुभाजकाला धडक दिली आणि नंतर कार दुचाकीवर जाऊन आदळली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार भरधाव […]
अधिक वाचा...पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
पुणेः कोंढवे गेट येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन मुलांना भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. संबधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनिष नवनाथ तावरे (वय 17) आणि अजिंक्य केदार पाटील (वय 17, दोघेही रा. कोंढवे धावडे) रात्री १०.३० च्या सुमारास रस्त्याने जात होते. अजिंक्य […]
अधिक वाचा...नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू…
नाशिक : नाशिकच्या दिंडोरी-म्हसरुळ रस्त्यावर बोलेरो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला उडून पडले होते. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ महामार्गावर आज (शुक्रवार) दुपारी दुचाकी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे जानोरी फाट्यावर […]
अधिक वाचा...सांगलीत भीषण अपघातात 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू…
सांगली: सांगली सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर, 10 ते 12 लोक जखमी झाले आहेत. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. मंगळवेढा तालुका चिकलगी भुयार येथील ऊसतोड […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…
बीड : लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोबत परत येत असताना नवरदेवाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची बहीण आणि चिमुकल्या भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या युवकाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. युवकासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई येथे नवरदेवाच्या दुचाकीला एसटी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…
अकोला: घरात लग्नाची तयारी सुरु असताना लग्न ठरलेल्या नववधूला होळीचा सण देण्यासाठी कुटुंब इंदूरला गेले होते. आई-वडिलासह इंदूरवरुन परत येताना मोटारीला अपघात झाला. अपघातामध्ये डॉक्टर निलेश माळोदे आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी रामराव माळोदे यांचा मुलगा दंत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजूरी राज्यमार्गावर झालेल्या अपघातात वधूपित्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी (ता. आंबेगाव) येथील रहिवासी संदीप दत्तात्रय पोपळघट (वय ५0) यांचे अपघाती निधन झाले. त्यांची कन्या ऋतूजा पोपळघट (वय १८) ही जखमी झाली आहे. संदिप पोपळघट यांचे मूळ गाव (देवी भोयरे-ता.पारनेर.जि.नगर) पण सध्या लोणी येथे […]
अधिक वाचा...अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…
अमरावती : एका कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. भातकुली गावाच्या परिसरात कारचे टायर फुटल्यानंतर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की […]
अधिक वाचा...Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…
नवी दिल्ली : एका व्यक्तीने मृत्यूलाही चकवा दिला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यू समोरून वेगाने आला आणि या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी…’ या म्हणीचा प्रत्येय येथे येताना दिसत आहे. एका व्यक्तीच्या समोरून मृत्यू वेगाने आला पण तिला काहीच करू शकला नाही. मृत्यू त्या व्यक्तीला […]
अधिक वाचा...
