
शासकीय कामात अडथळा व ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार 8 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मांडवा हेटी येथे शासकीय कामात अडथळा व ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार 8 आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
रस्त्याच्या मागणी करीता उपोषण सुरू असतांना मांडवा हेटी येथे हाणामारी झाल्याने मांडवा हेटी ग्रामपंचायत अधिकारी विष्णू नथ्थुजी सरकुंडे यांच्या लेखी तक्रारी वरुन दिगांबर अडथळे, गोलु डोळे, अंकुश भड, उत्तम भड, मधुकर भड, ज्ञानेश्वर साठे, रंजना भड व माया साठे या 8 आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 132, 189 (2), 121 (1) व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 3 (1) (r), 3 (1) (s), 3 (2) (va) अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने हे करीत आहे.
पोलिस सुत्रानुसार, मौजा मांडवा ग्रामपंचायत अधिकारी म्हणुन मांडवा येथे 2019 पासुन विष्णू सरकुंडे हे कार्यरत असुन मौजा मांडवा हेटी येथे दिंगाबर अवथळे याने मांडवा हेटी रस्ताच्या मागणी करिता उपोषण सुरु केले होते. दिनांक 2/1/2025 रोजी उपोषण स्थळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) व फिर्यादी विष्णू सरकुंडे हे भेट देण्यासाठी गेले होते. त्यानंतर उपोषण स्थळी भेट देउन दुपारी 12/30 वाजता परत पंचायत समीती घाटंजी येथे गेले. त्यानंतर गटविकास अधिकारी घाटंजी यांना रिना धनरे यांचा फोन आला की, तुम्ही ग्रामसेवक यांना उपोषण स्थळी पाठवुन द्या. आम्ही ग्रामसेवकाच्या हाताने उपोषन सोडुन घेते. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी विष्णू सरकुंडे यांना मांडवा हेटी येथे जाण्यास गट विकास अधिकारी यांनी सांगीतले. त्यावरुन विष्णू सरकुंडे यांनी म्हटले की, मी एकटा जात नाही. त्यामुळे त्यांचेसोबत वि.पी. सोळंके, विस्तार अधिकारी (पंचायत) व ग्रामपंचायत अधिकारी उत्तम मसराम व ग्रामपंचायत अधिकारी आशीष कोलते यांना सोबत पाठविले. उपोषण स्थळी गेल्यानंतर यु ट्युब चॅनलचे पत्रकार विलास महल्ले व दिनेश गाउत्रे यांनी फिर्यादी विष्णू सरकुंडे यांना काही प्रश्न उपोषन संर्दभात विचारले. त्यांची उत्तरे मी सविस्तर पणे दिली. रस्त्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ यांचे कडे पाठविले असल्याचे गावकऱ्यांना सांगीतले. तो प्रस्ताव मंजुर असल्याचे सांगीतले. सदर बाब जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी संबधीत आहे. सदर रस्ता हा बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे, असे सांगीतले. परंतु लोक ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते.
त्यानंतर मला उपोषणकर्ता दिंगाबर अवधळे (वय 48 वर्ष) याने डोक्यावर, गालावर मारले व त्यांनी मी आंध जातीचा असल्याने आंधाचा, भोसडीच्या, मादरचोदा तुले काही अक्कल नाही. मुर्खा तुला मारले पाहीजे, असे म्हणुन मांडवा येथील गोलु सुभाष डोळे (वय 19 वर्ष) अंकुश सुधाकर भड (वय 22 वर्ष), उत्तम भाउराव भड (वय 25 वर्ष) मधुकर भाऊराव भड (वय 24 वर्ष) ज्ञानेश्वर नागोराव साठे (वय 42 वर्ष) यांनी मारहाण केली. तसेच रंजना मधुकर भड व माया दिलीप साठे (वय 35 वर्ष) यांनी विष्णू सरकुंडे यांची कॉलर पकडुन शर्टचे बटन तोडले व पाठीवर, डोक्यावर, गालावर सुध्दा थापट्याने मारले. यात फिर्यादीचा चष्मा हरवला आहे. सदर घटना विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती घाटंजी व माझे सहकारी उत्तम मसराव व आशीष कोलते व ग्रामपंचायत कर्मचारी दिपक जगन्नाथ भरडे व ग्राम रोजगार सेवक रामचंद्र विठ्ठल मडावी यांचे समोर घडली आहे. फिर्यादी विष्णू सरकुंडे यांच्या जवळील रस्ता कामाचे ठराव व ईतर फाईल हिसकविण्यात आली. त्यामुळे संबधीतांवर शासकिय कामात अडथळा निर्मान करून, मारहान करुन जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. त्यावरुन 8 आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने हे करीत आहे.
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ महिलेने पळवले…
Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

