पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आढावा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुणे शहरातील 100 गुन्हेगार स्थानबद्ध
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का, तडीपार, एमपीडीए या कायद्यांचा कठोरपणे अवलंब करीत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. केवळ एका वर्षाच्या कालावधीत एमपीडीए कायद्यांतर्गत 100 गुन्हेगारांवर कारवाई करुन गुन्हेगारांना राज्यातील विविध कारागृहात त्यांना स्थानबद्ध केले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत अशा प्रकारची प्रभावी कारवाई करणारे रितेश कुमार हे पहिलेच पोलिस आयुक्त असावेत.

115 गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’
पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोक्का कारवाई करुन गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. रितेश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल 115 संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का कारवाई करुन अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हेगारांची समाजात निर्माण होत असलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाणेनिहाय माहिती घेऊन गुन्हेगारांवर कारवाई कारवाई केल्याने पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील 16 जणांवर मोक्का कारवाई केली आहे.

‘तरंग-2023’ यशस्वी आयोजन
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन पोलिस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती जनमानसातील सर्वसामान्य नागरिकांना अवगत व्हावी. तसेच पोलिस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलिस आयुक्तांनी ‘तरंग-2023’ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे दिनांक 22/12/2023 ते 24/12/2023 या कालावधीत पोलिस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी आयोजन केले होते.

भरोसा सेलचा ‘बालस्नेही कक्ष’
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून गुन्हे शाखेच्या भरोसा सेलच्या वतीने पोलिस ठाण्यात ‘बालस्नेही कक्षा’ची स्थापना करण्यात आली. होप फॉर दी चिल्ड्रन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात ‘बालस्नेही कक्षा’ ची स्थापना करण्यात आली आहे. ‘बालस्नेही कक्षा’ मध्ये विधीसंघर्षग्रस्त बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे समुपदेशन केले जाते. तसेच वेग वेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्होकेशनल कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मदत केली जाते.

महिलांसाठी ‘विशेष सुरक्षा मोहीम’
पुणे शहर हे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी अनेक महिला-मुली पुण्यात येत असतात. मात्र पुण्यात महिलांवर होणाऱ्या आत्याचारांचं प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या नोकरदार, महिलांची, विशेषत: आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विशेष सुरक्षा मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा समावेश असून पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रीची गस्त घालत आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!