
Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…
मुंबई (संतोष धायबर): पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, तीन दिवसांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (ता. ९) आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.
जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला होता. पाकिस्तानमधून आल्यानंतर ते पुन्हा सेवेत रूजू झाले होते. लष्करात राहून १२ वर्षे त्यांनी मातृभूमिची सेवा केली आहे. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ केले आहे. सीमेवर उभे राहून देशसेवा करण्याची इच्छा असतानाही आपल्याला बडतर्फ केले आहे. शिवाय, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पण मिळणार नाही, बँकेचा हप्ता आणि कुटुंब चालवायचे कसे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत. सेवेत पुन्हा दाखल करून घ्यावे, अन्यथा पेन्शन योजना सुरू करावी, अशी चंदू चव्हाण यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले होते.
लष्कर हा विषय केंद्र सरकारचा असल्यामुळे राज्यामध्ये आंदोलन करून उपयोग होत नव्हता. यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. न्यायालयीन लढा देणार आहे, असे चंदू चव्हाण यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर सांगितले. दरम्यान, चंदू चव्हाण यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नेटिझन्सकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत.
आर्थिक मदतीचे आवाहन…
चंदू चव्हाण यांच्या कुटुंबामध्ये दीड वर्षांचे बाळ आणि पत्नी आहे. पेन्शन मिळणार नसल्यामुळे कुटुंब चालवायचे कसे? असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. शिवाय, १२ लाख रुपयांचे बॅंकेचे कर्ज त्यांच्यावर आहे. न्यायालयीन लढाई देण्यासाठी जवळ पैसे नाहीत. यामुळे आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा केल्यास बँक वळवून घेईल. यामुळे त्यांनी पत्नीचा बँक खाते क्रमांक दिला आहे. एका जवानासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बॅंकेचे डिटेल्स पुढीलप्रमाणे…
Gayatri Chandu Chavan
State Bank Of India, Pramodnagar, Deopur, Dhule
Bank Ac No. – 40310893640
IFS Code: SBIN0001938
अधिक माहितीसाठी संपर्कः
चंदू चव्हाण : 88883 60382
Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…
कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

